Friday , September 22 2017
Home / ठळक बातमी / शास्त्रीय संगीत रसिकांसाठी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला “रसिया”चे आयोजन

शास्त्रीय संगीत रसिकांसाठी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला “रसिया”चे आयोजन

Rasiya

पुणे न्यूज, दि. 3 एप्रिल : भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार व्हावा याकरिता श्री. अरुण जोशी यांनी सहा महिन्यांपूर्वी ‘ RagaNXT ‘ या संस्थेची स्थापना केली. आजपर्यंत शास्त्रीय संगीतात पारंगत असलेल्या ३० सुप्रसिद्ध गायकांच्या सुमारे १२० हून जास्त नवीन रचना RagaNXT ने रसिकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि अजून गायकांच्या नवीन रचना नजीकच्या काळात ध्वनीमुद्रित करण्याचा RagaNXT चा संकल्प आहे.

दर्जेदार भारतीय शास्त्रीय संगीत दर्दी रसिकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी RagaNXT ने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ एप्रिल रोजी ‘ रसिया ‘ ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ७ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे सादर केला जाणार आहे.

रघुनंदन पणशीकर, सावनी शेंडे, अनुराधा कुबेर, संजीव चिम्मलगी, जयदीप वैद्य हे पाच आघाडीचे गायक या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. कार्यक्रमात सादर होणारी गीते लिहिली आहेत वैभव जोशी यांनी व त्यांना संगीतबद्ध केले आहे सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांनी. RagaNXT या संस्थेचे संस्थापक श्री. अरुण जोशी हे या कार्यक्रमाचे निर्माते आहेत. ‘रसिया’ हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांना शास्त्रीय संगीताची दैवी अनुभूती देऊन जाईल यासाठी RagaNXT हि संस्था प्रयत्नशील आहे.

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − 14 =