Sunday , June 25 2017
Home / ठळक बातमी / श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान मंदिरात चंदनऊटी कार्यक्रम संपन्न

श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान मंदिरात चंदनऊटी कार्यक्रम संपन्न

Pashan Someswar Temple

पुणे : पाषाण येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे सालाबादप्रमाणे चंदनउटी कार्यक्रम संपन्न झाला. सोमवार दि. 16 मे रोजी शंकराच्या संपुर्ण पिंडीला चंदनाचा लेप लावण्यात आला. पाषाण रोडवरील सोमेश्वर वाडी येथे श्री सोमेश्वर मंदिर आहे. पंचक्रोशितील पुरातन मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. नदी, नदीचे कुंड व त्यालगत असणारे मंदिर असा त्रिवेणी संगम असणा-या क्षेत्राला स्वयंभू तिर्थक्षेत्र संबोधिले जाते. यावेळी सामुदायिक संगीत भजन आणि किर्तनाचा कार्यक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले होते.

Pashan Someswar Temple1

मंदिराचे विश्वस्त विवेक बिराजदार यांचा सत्कार आमदार विनायक निम्हण यांनी केला. याप्रसंगी विश्वस्त पोपटराव जाधव, जनार्धन बिराजदार, खडके गुरुजी, खंडुशेठ अरगडे, पाषाण-बाणेर भजनी मंडळी व सोमेश्वर ग्रामस्थ उपस्थित होते.

IMG-20160517-WA0001

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *