Wednesday , August 15 2018
Home / गुन्हेगारी / संतापजनक : १६ वर्षीय मुलीवर 33 जणांनी केला तब्बल ३६ तास बलात्कार

संतापजनक : १६ वर्षीय मुलीवर 33 जणांनी केला तब्बल ३६ तास बलात्कार

ज्याप्रमाणे दिल्लीतील घटनेने संपुर्ण भारत हादरला तशाचप्रकारे ब्राझीलच्या या घटनेमुळे संपुर्ण जग हादरले आहे…

रिओ ऑलिंपिक स्पर्धेच्या ठिकाणी घटना घडल्यामुळे जगभर चिंतेचं वातावरण…

gangrape1

ब्राझील : ब्राझीलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ब्राझीलमधील रिओ शहरातील एका १६ वर्षीय तरुणीवर तब्बल ३३ नराधमांनी ३६ तास बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याघटनेमुळे दिल्लीमधील निर्भया बलात्काराच्या घटनेची आठवण ताजी झाली आहे. ज्यामुळे संपुर्ण भारत हादरुन गेला होता.

बंदुकीच्या धाकाने ३३ जणांनी हे दुष्कृत्य केले आहे. २० मे च्या रात्री पीडित तरुणी तिच्या प्रियकराच्या घरी गेली होती त्यानंतर तिच्या दुर्दैवाला सुरुवात झाली. त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी काही जणांनी तिचे आक्षेपार्ह फोटो ट्विटरवर टाकल्यानंतर ही घटना उघड झाली. पीडित तरुणीला या घटनेनंतर मानसिक धक्का बसला असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रिओ ऑलिंपिक स्पर्धा अवघ्या दोन महिन्यांवर आली असताना त्यापूर्वी ही भयंकर घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना रिओमध्ये घडली आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 5 =