Wednesday , August 15 2018
Home / आज पुण्यात / सरकारला ‘नीट’ बुद्धि दे

सरकारला ‘नीट’ बुद्धि दे

Studen protest against neet

पुणे न्यूज़- सरकारच्या हलगर्जी पणामुळे लाखों विद्यार्थ्याना सीईटी दिल्या नंतर ही नीट परिक्षा दयाविच लागणार आहे. त्यामुळे ऐन वेळेस नीटला समोर कस जायच या बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यामध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. आज पुण्यामधे सरकार विरोधात चिंताग्रस्त पालकांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण पुकारल होत. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गणरायाची आरती करत. सीईटी ऐवजी नीट परीक्षा द्यायला लागणं या करता राज्य सरकारला जबाबदार ठरवल, या वेळी विदयार्थी आणि पालक यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

सरकार आमच्या आयुष्याशी खेळत आहे एवढी मेहनत केेल्या नंतर ती वाया जाणार आहे. शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यावर बोलायला तयार नाहीत. हे देवा सरकारला बुद्धि दे आणि सीईटी पुन्हा सुरु होवो यासाठी आज गणपतीची आरती करण्यात आली. एमबीबीएस बीडीएस च्या वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय पद्धितीनेच प्रवेश घेण्याचा न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर. शासन कुठेतरी आपली बाजु मांडण्यामधे कमी पडल्यामुळे विधार्थ्यांचे नुकसान होणार आहे हा आरोप करत जर मुलांच्या जीवाच बर वाइट झाल तर याला जबाबदार सरकारच असेल आसा इशारा ही पालकांनी दिला.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + 3 =