Sunday , September 23 2018
Home / गुन्हेगारी / सामूहिक बलात्काराने पुणे हादरले…

सामूहिक बलात्काराने पुणे हादरले…

Gang Rape In Pune

आयटी पार्कमध्ये काम करणा-या 24 वर्षीय तरुणीवर सहकारी मित्रांनीच केला बलात्कार

rape

पुणे, दि. 28 फेब्रुवारी : सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या 24 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील मुंढवा भागात हि घटना घडली आहे.

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्याने आणि त्याच्या मित्रांनी या तरुणीवर गँगरेप केल्याचा आरोप आहे. गँगरेप प्रकरणी पाचही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

rape1
सुट्टीमुळे ऑफिसमधल्या मित्राबरोबर पीडित तरुणी पार्टीसाठी जाणार होती. त्याआधी आरोपी मित्राने या तरुणीला शितपेयातून गुंगीचे औषध पाजले. त्यामुळे पिडीत तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर बेशुद्धावस्थेत या तरुणीला एकाच्या धानोरीतल्या फ्लॅटवर नेण्यात आले. तिथे आरोपीचे आणखी चार मित्र होते. त्या मित्रांनीही दारू प्यायली होती. त्या पाच जणांनी नशेमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याआधी हडपसरमध्ये फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर या घटनेच्या दहा दिवसानंतर पुण्यातील सिम्बॉयसीस परिसरातील हनुमान टेकडीवर 24 फेब्रुवारीला महाविद्यालयीन तरूणीवर बलात्कार झाला होता. त्यामुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 + 1 =