Wednesday , July 18 2018
Home / ठळक बातमी / ‘सैराट’चा “जबराट फॅन”; नागराजच्या प्रेमापोटी त्याने केला चक्क 211 किलोमीटर सायकल प्रवास…

‘सैराट’चा “जबराट फॅन”; नागराजच्या प्रेमापोटी त्याने केला चक्क 211 किलोमीटर सायकल प्रवास…

सैराटच्या यशासाठी जबराट फॅनचे पुण्याच्या दगडूशेट गणपतीला साकडे… बार्शी(जि.सोलापूर) ते पुणे सायकल प्रवास…

Sairat Fan (3)

पुणे न्यूज नेटवर्क : ‘सैराट’ला राज्यभरात अपेक्षेप्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळत आहे. फँड्रीनंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित हा दुसरा सिनेमा आहे. उत्कृष्ट संगीत, दिग्दर्शन यामुळे हा सिनेमा अनेकांच्या पसंतीस येताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर ‘फ़ॅंड्री’, ‘सैराट’ आणि नागराज मंजुळे यांचा चाहता वर्गदेखील मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे.

नागराजच्या अशाच एका चाहत्याने ‘सैराट’च्या प्रमोशनसाठी पोस्टरसह सायकलने प्रवास केला. या चाहत्याने बार्शी ते पुणे अंतर ‘सैराट’च्या पोस्टरसह सायकलवर पार केलं आहे. शौकत शेख (बार्शीकर) असं या चाहत्याचं नाव आहे. बार्शी ते पुणे हे अंतर साधारणत: 200 ते 250 किमी आहे. या प्रवासात त्याने इंदापूर आणि उरळीकांचन या दोन ठिकाणी थांबे घेतले आणि तीन दिवसांनी पुण्यात दाखल झाला. शौकत स्वत:ला नागराजचा मित्र असल्याचं सांगतो. नागराज मंजुळेवरील प्रेमापोटी हे अंतर सायकलवर पार करत बार्शीवरुन पुण्यात आल्याचं सांगितलं. याआधी फँड्रीचंही असंच प्रमोशन केल्याचं शौकत बार्शीकरने सांगितलं. पुण्यात येउन शौकतने दगडूशेट गणपतीचे दर्शन केले आणि सैराटच्या यशासंदर्भात बाप्पाला साकडे घातले. शौकत धर्माने मुस्लिम असले तरि त्यांची श्रद्धा सर्व देवांवर आहे. नागराजचा हा जबरा फॅन आता सर्वांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे.

Sairat Fan (4)

दरम्यान, शौकत हे बार्शी (जि.सोलापूर) येथे राहत असून तेथेच मोल-मजूरीचे काम करतात. पुण्याला सायकलवर येण्यासाठी त्यांनी चक्क लोकवर्गणीतून सायकल भाड्याने घेतली. यामध्ये त्यांना बार्शीचे नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांची मोलाची मदत झाली. त्याचबरोबर शौकत यांच चित्रपट आणि नागराज यांच्यावरिल प्रेम पाहून तसेच एक मुस्लिम बांधव हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवून दगडूशेट मंदिरात दर्शनासाठी तसेच चित्रपटाच्या यशासाठी साकडे घालण्यासाठी आल्याचे पाहून मंदिराचे सुरक्षारक्षकदेखील भारावून गेले. त्यामुळे या सुरक्षारक्षकांनीदेखील त्यांना थोडीसी आर्थिक मदत केली. जात, धर्म, भाषा, प्रदेशाचे कोणतेच बंधन चाहत्यांना लागू होत नाही याचेच उत्तम उदाहरण म्हणजे शौकत शेख (बार्शीकर).

दरम्यान, दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ सिनेमाने अक्षरश: प्रेकक्षकांना याड लावलं आहे. चाहत्यांवर ‘सैराट’ची झिंगची चढली आहे.

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − 2 =