Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / ‘सैराट’चा संदर्भ थेट तुकोबांच्या अभांगात… जाणून घ्या ‘सैराट’ या शब्दाचा अर्थ…

‘सैराट’चा संदर्भ थेट तुकोबांच्या अभांगात… जाणून घ्या ‘सैराट’ या शब्दाचा अर्थ…

sairat

पुणे न्यूज नेटवर्क : नुकताच बहुचर्चित “सैराट” चित्रपट प्रदर्शित झाला. सैराट या शब्दाबद्दल सर्वानाच औत्सुक्य होतं. पण ह्या शब्दाचा संदर्भ थेट तुकोबांच्या अभांगातही सापडतो. जाणून घेउयात या अभंगाचा अर्थ…

tukaram maharaj

पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट ।

मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवुनि ललाट वो ॥१॥

कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी । होतें वहिलें लपाला आतां खांदीं ।

कोठें आड आली हे देहबुद्धी । धांवा आळवीं करुणा कृपानिधी वो ॥ध्रु.॥

मागें बहुतांचा अंतरला संग । मुळें जयाचिया तेणें केला त्याग ।

पहिलें पाहातां तें हरपलें अंग । खुंटली वाट नाहींसें जालें जग वो ॥२॥

शोकें वियोग घडला सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा ।

केला उच्चार रे घडल्या दोषांचा । जाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥३॥

अर्थ :– कोपिबरोबर रासक्रीडा करात असताना एकदा गोपिला गर्व झाला; म्हणून श्रीकृष्ण एका गोपिला घेऊन सर्वाना चुकवुन जात होता. तिलाही आपण श्रेष्ट आहेत, ऐसा अभिमान झाला आणि कृष्णने आपल्याला उचलून खांद्यावर घ्यावे असे तिला वाटू लागले. त्यावेळी तिलाही तेथेच टाकून कृष्ण अदृश्य झाला. त्याला शोधण्यासाठी भ्रमिष्ट होऊन ती गोपी सैरावैरा धावु लागली. गोविंदाचे वेड लागले असल्यामुळे ती कृष्णचा थावठिकाना सर्वाना वीचारु लागली. संसाराचा त्याग गरुण जागोज़ागी कृष्णचि पदाचीन्हें पाहुन त्यावर मस्तक ठेऊन वंदन करू लागली ।।1।।

राणातील वृक्षलताना गोविंदाचा थावठिकाना वीचारु लागली, “अताच श्रीकृष्ण मला खांद्यावर घेत होता आणि अचानक कोठे अदृश्य झाला? माझा देहाभिमान आडवा आला असेल का? काही कळत नाही. त्या कृपाळु करुणानिधीची आळवन करा ।।ध्रु।।

या देवाच्या संगतीला लाभ व्हावा म्हणून मी घरातील सर्वांचा त्याग केला; परंतु त्या धरीकृष्णने मात्र माझ्याच त्याग केला आहे. पुढे पाहिल तर श्रीकृष्ण दृष्टिस् पडत नाही. मागे सारे जग नाहीस झाले आहे. आता माझा मार्गच कुंठित झाला आहे ।।2।।

कृष्णच्या वियोगामुळे अश्या प्रकारे सर्व गोपिका शोकाकुल झाल्या . ‘देवा, आमच्याकडून अपराध झाला आहे.’ अशी त्यांनी हातून घडलेल्या पापाची काबुली दिली. पश्चाततापाचा उच्चार केला. त्याबरोबर या तुकयाचा स्वामी श्रीकृष्ण प्रकट झाला ।।3।।

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 3 =