Monday , October 23 2017
Home / ठळक बातमी / ‘सैराट’ने मराठ्यांची लायकी काढली, तरीही मराठे शांत कसे?

‘सैराट’ने मराठ्यांची लायकी काढली, तरीही मराठे शांत कसे?

सोलापूरमधील ‘मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात’ आमदार नितेश राणे यांचे चिथावणीखोर वक्तव्य…

पुणे न्यूज नेटवर्क : बाजीराव मस्तानीमध्ये काशीबाई नाचल्याचं दाखवल्यावर ब्राह्मण समाज उठून उभा राहतो, मात्र मराठ्यांची लायकी काढणारा चित्रपट 80 कोटी कमावतो तरिहि मराठा समाज शांत कसा? असं चिथावणीखोर वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी सोलापूर येथे मेळावा घेण्यात आला होता. या ‘मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात’ काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच राज्यभर गाजलेल्या सैराट चित्रपटावरही नितेश राणे यांनी टीका केली आहे.

rane

आज मराठी चित्रपट सृष्टीत सैराट’मैलाचा दगड ठरला आहे. सैराटच्या यशाचं सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. तर कुठे नाराजीचा सूरदेखील उमटत आहे. आता यात काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी उडी घेतलीये.

मराठी चित्रपट सृष्टीत सैराट हा अतिशय चांगला सिनेमा आहे. त्याने मोठी कमाईही केली आहे. पण कला वेगळी आणि विषय वेगळा असतो. मराठ्यांची लायकी काढणारा सैराट सारखा चित्रपट 80 कोटींची कमाई करतो. तरीही मराठा समाज शांत बसतो. दुसरीकडे मात्र काशीबाई नाचवल्याचं दाखवलं की सगळं राज्य डोक्यावर घेतले जात असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 5 =