Wednesday , August 15 2018
Home / आज पुण्यात / स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन…

स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन…

 स्वारगेट परिसरातील वाहतुक कोंडी सुटण्यास मदत…

 

Swarget Flyover (2)

पुणे न्यूज नेटवर्क : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे अखेर आज लोकार्पण झाले. शहरातील विकास कामांच्या आणि राजकिय श्रेयवादाच्या लढाईत हा प्रश्न अनेक दिवस रेंगाळत पडला होता. अखेर आज(शुक्रवार) अजित पवार यांच्या हस्ते  स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी आमदार मोहन जोशी, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ आणि नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

Swarget Flyover (1)

स्वारगेट ते साईबाबा मंदिर चौकादरम्यानच्या बाजूचे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये उद्‌घाटन झाले आहे. आता शंकरशेठ रस्ता ते नेहरू स्टेडियम दरम्यानच्या ग्रेड सेपरेटरच्या कामास प्रारंभ होणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचे उद्‌घाटन झाल्यामुळे स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.swarget fly over innauguration

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × one =