Wednesday , August 15 2018
Home / गुन्हेगारी / हॅलो… ” पुण्यात बॉम्ब ठेवलाय “…

हॅलो… ” पुण्यात बॉम्ब ठेवलाय “…

Bomb

पुणे न्यूज नेटवर्क : पोलिस कंट्रोल रूमला एक निनावी फ़ोन येतो… ” हम छे लोग पाकिस्तान में ट्रेनिंग लेके आये हैं… और हमने पुणे स्टेशन, फ़ीनिक्स मॉल, मुंबई एअरपोर्ट और 2 -3 जगहों पर बॉम्ब लगाये हैं… लेकिन मुझे अब मेरा जमीर गलत होने का एहसास करा रहा हैं… आप जल्दी से बॉम्ब डिफ्यूज कर सको तो करो”…  हा फोन होताच बॉम्ब शोधक पथक, दहशद वाद विरोधी पथक,  बॉम्ब ठेवल्याचे ठिकाणी पोहचले. सगळीकड़े कसून तपास केल्यानंतर हा निनावी फोन खोटा असल्याचे उघड झाले.

निनावी फोन करणाऱ्या व्यक्तिचा पोलिसांनी तपास केला असता पुढे आलेल्या माहितीमुळे पोलिसांची  ‘हसाव की रडाव’ अशी परिस्थिती झाली. मिळालेल्या माहिती नुसार संजीवकुमार मिश्रा (मुळ रा.भुवनेश्ववर), सध्या कात्रज येथील लॉजवर राहत आहे. काही महिन्यापूर्वी भुवनेश्ववरुन मुंबईला येताना विमानामधे संजीवकुमार कडून ऐका महिलेच्या अंगावर चहा सांडला गेला. महिलेन केलेल्या तक्रारीमुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच दिवशी मुंबईवरुन पुण्याला येताना मुंबई-पुणे महामार्गा वर नियम मोडल्यामुळे वाहतुक पोलिसांनी संजीवकुमारला दंड केला होता.

याचा राग येवुन पुण्यात आल्या आल्या या माथेफिरूने नागपुर – भुवनेश्ववर विमानामधे बॉम्ब ठेवल्याची खोटी बातमी दिली होती. यामध्ये पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवत अटक ही केली होती. या सर्व घटना आणि व्यसनाधीनतेमुळे बायको मुलं आपल्याला सोडुन गेली आहेत. त्यामुळे पोलिसांना त्रास द्यायचा म्हणून हा माथेफिरू वारंवार बॉम्बचे खोटे फोन करत आहे.

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × four =