Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / हेमा कोटणीस यांना “एलिट मिसेस इंडिया”चा खिताब

हेमा कोटणीस यांना “एलिट मिसेस इंडिया”चा खिताब

DSC_0265

पुणे न्यूज नेटवर्क : केवळ पुणेच नव्हे तर देशाला अभिमानास्पद अशा “एलिट मिसेस इंडिया (वर्ल्ड)” स्पर्धेमध्ये पुण्यातील श्रीमती हेमा कोटणीस यांना दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विनोदबुद्धी, देहबोली आणि परीक्षकांच्या प्रश्नांना सजगतेने दिलेली उत्तरे यांसाठी कोटणीस यांची निवड करण्यात आली. कोटणीस यांनी या यशाचे श्रेय आपले कुटुंबीय, सौंदर्यस्पर्धा प्रशिक्षण आणि फिनिशिंग स्कूल बीडॅझल आणि हितचिंतकांना दिली. त्यांच्यामुळे या स्पर्धेमध्ये यश मिळविणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
“या स्पर्धेपूर्वी मी सौंदर्यस्पर्धेचे प्रशिक्षण घेतले. ही स्पर्धा फक्त दिसण्याची नसून प्रतिभा, आत्मविश्वास आणि देहबोली यांची असल्याचा मला विश्वास होता. हे विचार माझ्या मनात कायम होते आणि माझ्या यशात मला त्यांची मदत झाली,” असे त्या पुढे म्हणाल्या.

पुण्यातील अग्रगण्य सौंदर्यस्पर्धा प्रशिक्षण आणि फिनिशिंग स्कूल असलेली बीडॅझल ही प्रतिष्ठेच्या “एलिट मिसेस इंडिया 2016” साठी पार्टनरची तयारी करवून घेत होती. याची अंतिम फेरी प्रसिद्ध प्राईड अंबर विलास, जयपूर येथे शनिवार 4 जून 2016 रोजी आयोजित करण्यात आली होती. एलिट इंडिया पीजंट्स ईआयपीने महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये ऑडिशन घेण्यासाठी बीडॅझलची अधिकृतरित्या नेमणूक केली होती.
मुंबई, कोल्हापूर, गोवा, नाशिक, नागपूर आणि पुण्यातील अनेक इच्छुक यासाठी बीडॅझलकडे आले होते. यातील प्रथम आलेल्या उमेदवारांना जयपूरला जाण्यापूर्वी (1 आठवडा)तीव्र प्रशिक्षण देण्यात आले. समतोल, देहबोली, कम्युनिकेशन, रॅम्प वॉक, प्रश्नोत्तरे अशा बाबींबाबत त्यांना मार्गदर्शन कराण्यात आले. खास मंचावरील परिचयावर देखील काम करून त्याचा सराव करून घेण्यात आला. यातील शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या स्पर्धकांना संवाद कौशल्ये, रॅम्पवॉक आणि सॉफ्ट स्कील अशा विविध पैलूंचे प्रशिक्षण देण्यात आले.

बीडॅझलमधील स्पर्धकांनी सर्वश्रेष्ठ 6 पैकी 3 बक्षीसे जिंकली –
– हेमा कोटणीस: प्रथम उपविजेती मिसेस इंडिया प्लॅटिनम
– फराह अन्वर: प्रथम उपविजेती मिसेस इंडिया
– सुजा कृष्णन: द्वितीय उपविजेती मिसेस इंडिया प्लॅटिनम

या महिलांनी अन्य अनेक अनुषंगिक पुरस्कारही जिंकले – मिसेस परफेक्ट 10, मिसेस इन्स्पिसरेशनल, मिसेस कॅटवॉक, मिसेस एलिट

मॉडेल इ. याशिवाय पल्लवी कौशिक यांना मिसेस स्टाईल आयकॉनचा खिताब बहाल करण्यात आला, काजल अग्रवाल यांना मिसेस ब्युटिफूल पुरस्कार तर आस्मा उपरे हिला मिसेस टॅलेंटेड आणि मिसेस बीडॅझल आणि सपना मणिशंकर हिला मिसेस ब्युटिफूल स्माईल पुरस्कार देण्यात आला. या दोघीहीनागपूर येथील आहेत.

संजय ह्युंदाई यांच्या सहकार्याने बीडॅझलने सर्वात प्रेरणादायी महिलेला एक भव्य बक्षीस जाहीर केले. त्या अंतर्गत एका नवीन चकाकत्या आय-20 गाडीच्या चाव्या ‘बीडॅझल राणी’चा खिताब मिळविणाऱ्या हेमा कोटणीस यांना प्रदान करण्यात आल्या. संजय ऑटोमोबाईल इंजिनिअर्स प्रा. लि. चे सरव्यवस्थापक (विक्री) डेक्स्टर फर्नांडिस यांच्या उपस्थितीत जया शेट्टी यांनी या चाव्या त्यांना दिल्या.

DSC_0324

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 + 16 =