Monday , November 20 2017
Home / ठळक बातमी / १२ वी चा निकाल वेळेवर लागणार…

१२ वी चा निकाल वेळेवर लागणार…

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे असहकार आंदोलन मागे…
शिक्षणमंत्री विनोद तावडे शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक…
SSC-HSC-exams
मुंबई :  गेल्या अनेक वर्षांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यात येणार असून शासन त्यासाठी सकारात्मक असल्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याने १२ वीच्या उत्तरपत्रिका तपासणीसंदर्भातील असहकार आंदोलन आज मागे घेत असल्याचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने आज जाहीर केले आहे. यामुळे १२ वीचा निकाल वेळेवर लागणार आहे.
शिक्षक आमदार रामनाथ मोते, कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे अनिल देशमुख व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात आज या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. आयटी शिक्षकांना तातडीने मान्यता देण्यात येतील, त्यांच्या अनुदानाचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला जाईल, मुल्यांकनास पात्र कायम विना अनुदानित महाविद्यालयांना व तुकड्यांना अनुदान दिले जाईल, २४ वर्षांच्या सेवेनंतर सर्वांना निवडश्रेणीचा लाभ मिळेल, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात येईल यासह अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याने हे असहकार आंदोलन मागे घेण्यात आले.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 − eight =