Tuesday , January 23 2018
Home / ठळक बातमी / ५ मे रोजी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही – विनोद तावडे

५ मे रोजी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही – विनोद तावडे

 

 

परीक्षेला पूर्ण तयारीनिशी बसण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आवाहन

Vinod Tawade

मुंबई दि २९- महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्राची एमएच-सीईटी ही परीक्षा ५ मे २०१६ रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखेमध्ये कोणताही बदल होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता पुर्ण तयारीनिशी ही परीक्षा द्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.

 

विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पातळीवरील ‘नीट’ परीक्षा याच शैक्षणिक वर्षापासून घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ‘नीट’ यंदापासून लागू करायची झाल्यास पहिल्या टप्प्यात १ मे रोजी आणि दुसऱ्या टप्प्यात २४ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. यासंदर्भात विदयार्थ्यांध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एमएच सीईटी परीक्षेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार आशिष शेलार, वैदयकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे उपस्थित होते.

 

श्री. तावडे म्हणाले की, मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालावरुन विदयार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र विदयार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता ५ मे २०१६ रोजी होणारी एमएच-सीईटी परीक्षा दयावी असे आवाहन मी या निमित्ताने करीत आहे. येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारच्या वतीने फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून दोन अधिकारी नवी दिल्ली येथे पोहोचले आहेत. तसेच सदर याचिकावर राज्य सरकारची बाजू मांडण्यासठी  विशेष वकीलांची  मदत घेण्यात येत आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + 2 =