Monday , September 24 2018
Home / ठळक बातमी / ​ईशान्य भारत हा भारत व आग्नेय आशिया यांना जोडणारा दुवा ठरेल – गोखले

​ईशान्य भारत हा भारत व आग्नेय आशिया यांना जोडणारा दुवा ठरेल – गोखले

????????????????????????????????????
????????????????????????????????????

पुणे, दि १४ जुलै : रस्ते, रेल्वे यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, स्थलांतरीतांसंबंधीचा व्यावहारिक दृष्टीकोन, भारतीय समाजाचा ईशान्य भारताकडे बघण्याचा व्यापक दृष्टीकोन यांसारख्या धोरणांच्या यशस्वी अंमलबजावणीने ईशान्य भारत हा भारत आणि आग्नेय आशिया यांना राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या जोडणारा दुवा ठरेल असे मत लेखक व ईशान्य भारताचे अभ्यासक नितीन गोखले यांनी आज पुण्यात व्यक्त केले. पुणे इंटरनॅशनल सेंटर व सेंटर फॉर ऍडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्ट्‌डीज यांच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पीआयसीचे विश्वस्त दिलीप पाडगांवकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. गोखले यांनी यावेळी ईशान्य भारतातील परिस्थिती, त्याचे राजकीय महत्त्व, त्या ठिकाणच्या अडचणी आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना गोखले म्हणाले, “आसाम, अरुणाचल, मिझोराम, नागालॅण्ड, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर यांना घेऊन बनणारा भारताचा भाग हा मुख्यत: ईशान्य भारत म्हणून ओळखला जातो. भारताचा एक समृद्ध असा भूभाग समजल्या जाणा-या या भागात नैसर्गिक समृद्धी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र असे असले तरी या भागातील नागरिक हे गेली अनेक दशके भारताच्या मुख्य भूभागापासून सामाजिक दृष्ट्या दुरावत गेले आहेत. याशिवाय केंद्र सरकार कडून मिळत असलेली सापत्न वागणूक, वाढलेला भ्रष्टाचार हे प्रश्न त्यांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. त्यामुळे भविष्यात उर्वरित भारताचा ईशान्य भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणखी बदलणे गरजेचे आहे.”

फाळणीचे दूरगामी परिणाम जसे पंजाब आणि उर्वरित भारताला भोगावे लागेल तसे ते ईशान्य भारतालाही भोगावे लागले. मात्र या परिणामांचा फार मोठा परिणाम हा अजूनही ईशान्य भारतावर टिकून आहे. कारण यामुळे तयार झालेल्या सीमा याच ईशान्य भारताची दुखरी नस बनल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या भागात संपर्क सुविधांची योग्य सोय करणे, रेल्वे व रस्त्याचे जाळे विणने, या भागाला सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या इतर भागांशी जोडणे गरजेचे आहे असेही गोखले यावेळी म्हणाले.

डॉ. दिलीप पाडगांवकर यांनी यांनी आभार मानले तर प्रशांत गिरबने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 4 =