Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / 10 ते 12 डिसेंबर रोजी वीजबील भरणा केंद्र सुरु राहणार…..

10 ते 12 डिसेंबर रोजी वीजबील भरणा केंद्र सुरु राहणार…..

mseb

 15  डिसेंबर पर्यंत 500 च्या जुन्या नोटा स्वीकारणार

पुणे, दि. 07 : थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्ग दि. 10 ते 12 डिसेंबर या सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत.

दरम्यान, राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. 15 डिसेंबरपर्यंत घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या वीजबिलासाठी 500 रुपयाच्या जुन्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे.

थकीत देयकांपोटी सध्या वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात आहे. तसेच कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी ‘नवप्रकाश’ योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. यातील थकबाकीसह चालू देयकांच्या रकमेचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी शनिवारी (दि. 10), रविवारी (दि. 11) व सोमवारी (दि. 12) या तीन दिवशी सार्वजनिक सुटी असली तरी पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्ग कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. तसेच थकबाकी व चालू देयकांसाठी 500 रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे.

याशिवाय घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + sixteen =