Monday , November 20 2017
Home / ठळक बातमी / फर्ग्युसनच्या वसतिगृहामध्ये राहिलो नसतो तर मोठा झालो नसतो – प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे

फर्ग्युसनच्या वसतिगृहामध्ये राहिलो नसतो तर मोठा झालो नसतो – प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे

नेमाडेंना  ‘फर्ग्युसन गौरव’ पुरस्कार प्रदान

Nemade
पुणे न्यूज, दि. ३ एप्रिल : द फर्ग्युसनिस्ट या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात येणारा ‘फर्ग्युसन गौरव’ पुरस्कार ज्ञानपीठ विजेते प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आला.  केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार नेमाडेंना  देण्यात आला.  राज्याचे पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित, दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि जलतरणपटू रोहन मोरे यांना देखील यावेळी ‘फर्ग्युसन अभिमान पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात आले.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार राहुल नार्वेकर, संघटनेचे अध्यक्ष यशवंत मेहेंदळे, कार्याध्यक्ष अॅड. विजय सावंत या वेळी उपस्थित होते.

‘कोसला’ नेमाडे हे फर्ग्युसन कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कादंबरीत असलेलं पांडुरंग सांगलीकर हे पात्र फर्ग्युसन कॉलेजचे होते. फर्ग्युसनच्या वसतिगृहामध्ये राहिलो नसतो तर कदाचित मी मोठा झालो नसतो. पंचवीशीतील मुलांचे प्रश्न मी ‘कोसला’तून मांडले. मुलांच्या मनात भावनांची वादळे असली तरी प्रत्यक्षात त्यांचे प्रश्न कोणीच सोडवत नसतो, हे सूत्र असलेली ही कादंबरी चार पिढय़ांना भावली. त्यामुळे ‘कोसला’चे यश माझे नाही तर फग्र्युसनच्या वसतिगृहाचे आहे, असे नेमाडे यांनी यावेळी सांगितले.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − two =