Monday , November 20 2017
Home / क्रीडा / मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उद्या बारामतीत…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उद्या बारामतीत…

रोहित शर्मा, अजिंक्य राहणे, वसिम जाफर, अमोल मुजुमदार, अजित आगरकर उपस्थित राहणार…
उद्या बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा लोकार्पण सोहळा…

sachin tendulkar in baramati Pune news
पुणे न्यूज, दि. ५ एप्रिल : बारामती नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या लोकार्पण सोहळ्याचं उद्या (बुधवारी) आयोजन करण्यात आले आहे. यानिमिक्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उद्या बारामतीत येणार आहे. त्यामुळे बारामतीत त्याच्या स्वागताची सध्या जय्यत तयारी झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य राहणे, वसिम जाफर, अमोल मुजुमदार, अजित आगरकर हे क्रिकेटवीर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

यावेळी मुंबई आणि महाराष्ट्र संघांमध्ये ट्वेन्टी ट्वेन्टीचा सामनाही खेळवण्यात येणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपेक्षाही हे स्टेडियम मोठे असून, भविष्यात या मैदानावर आंतराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळवण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष योगेश जगताप म्हणाले. ⁠⁠⁠⁠

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + 14 =