Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / 36 तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या चिमुकल्याची प्राणज्योत मालावली…

36 तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या चिमुकल्याची प्राणज्योत मालावली…

मांडवगण फराटा येथील जुनामळा येथे बोअरवेलमध्ये अडकलेल्या सुनिल हरिदास मोरे या चिमुकल्याचा मृत्यू

Sunil more Boarwell

पुणे न्यूज, दि. 2 मे : 30 एप्रिल सकाळी 12 वाजता बोअरवेलमधे पडलेल्या 4 वर्षीय सुनील मोरे या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन या चिमुकल्या सुनीलला 1 मेच्या 6 वाजता तब्बल 31 तासांनंतर बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान सुनीलने अखेरचा श्वास घेतला.

 शिरुरमधील मांडवगण फराटा येथील जुना मळा येथे 25 फूट बोअरवेलमध्ये सुनील हरिदास मोरे हा 4 वर्षांचा चिमुकला खेळत असताना बोअरवेलमध्ये पडल्याची घटना काल दुपारी घडली होती. त्याला बोअरवेल मधुन काढण्यासाठी बाजुलाच समांतर खड्डा खोदून बाहेर काढण्याचे एनडीआरएफच्या जवानांनी पर्यत्न चालवले होते. त्याला कृत्रिम ऑक्सिजनही देण्यात येत होता.

31 तासांपेक्षा जास्त काळ सुनील या बोअरवेलमध्ये अडकून पडला होता. अन्न पाण्याविना त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या. भुकेमुळे आणि उष्णतेमुळे त्याच्या शरीरातील पाणी आणि शुगर कमी झालं होतं. खड्डा खोदत असताना काळा पाषाण लागल्याने त्यातून सुनीलला कसलीही इजा न होता बाहेर काढणे आव्हान बनले होते. तरीही एनडीआरएफच्या जवानांनी सुनीलला बाहेर काढलं. मात्र, उपचारादरम्यान चिमुरड्या सुनीलने अखेरचा श्वास घेतला.

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × four =