Wednesday , August 15 2018
Home / गुन्हेगारी / Pune News Network | Impact : “गावडेवाडी प्रकरण”

Pune News Network | Impact : “गावडेवाडी प्रकरण”

पुणे न्यूज नेटवर्कच्या पाठपुराव्याला यश!

फुस लावून पळविलेली अल्पवयीन मुलगी सुखरुप पालकांच्या ताब्यात…

आरोपीला पोलिसांनी केली अटक…

मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना…

Manchar Police Station (2)

पुणे न्यूज नेटवर्क : मंचर येथील गावडेवाडी गावात एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. याबाबत मुलींच्या घरच्यांनी मंचर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. मात्र महिनाभरानंतर देखील त्या मुलाचा शोध लागत नव्हता. गावडेवाडी येथील एका 17 वर्षीय मुलीला शेजारी राहणा-या एका 32 वर्षीय विवाहित पुरुषाने फुस लावून पळवुन नेले होते. मात्र पुणे न्यूज नेटवर्कच्या पाठपुराव्यानंतर पोलिस प्रशासनाने जलद गतीने तपास करत आरोपीला शोधून काढले. आणि त्याच्याबरोबर असलेल्या मुलीला तीच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.

मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा प्रकारच्या घटनामध्यें दिवसेंदिवस मोठी वाढ झालेली पहायला मिळत आहे. गेल्यावर्षी अशाच प्रकारे अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या 6 घटना दाखल झाल्या आहेत. तर यावर्षी मे पर्यंत 6 अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यात आले आहे. तसेच गेल्यावर्षी तब्बल 23 सज्ञान मुली हरविल्याची तक्रार पालकांनी याच पोलीस स्टेशनला केली आहे.

Manchar Police Station (1)

गावडेवाडीच्या या प्रकरणात महिना उलटून गेला तरि मुलीचा शोध लागत नसल्यामुळे पालक चिंतातूर झाले होते. पोलिस तपासात कसूर करत आहेत असा आरोप मुलीचे पालक करत होते. पालकांनी पुणे न्यूज नेटवर्कशी संवाद साधत घटनेची सगळी माहिती दिली. त्यानंतर पुणे न्यूज नेटवर्कच्या वतीने मंचर येथे जाउन घटनेचा सतत पाठपुरावा केला. त्यामुळे पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला जलदगतीने अटक केली.

मुलगी पालकांच्या ताब्यात मिळाल्यामुळे पालकांच्या चेह-यावर समाधान जाणवत होते. तर आरोपीला पुढील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

“गावडेवाडी प्रकरण” अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले…

काय होते “गावडेवाडी प्रकरण” read more – http://goo.gl/47oIGO

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + three =