Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / (Sunday Special: उन्हापासून बचाव : प्राण्यांसाठी ठंडा ठंडा कुल कुल…)

(Sunday Special: उन्हापासून बचाव : प्राण्यांसाठी ठंडा ठंडा कुल कुल…)

पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांसाठी कुलर आणि स्प्रिंकलर…

वाढत्या तापमानाच्या बचावासाठी कात्रज सर्पोद्यानात प्राण्यांसाठी कुलर, स्प्रिंकलर चा वापर…

katraj

(विरेश आंधळकर) पुणे न्यूज, दि. 24 एप्रिल:  दिवसेंदिवस वाढत जाणारा उन्हाचा तडाखा… तापमानाने गाठलेला 40°- 42° चा पारा… ह्या वाढत्या तापमानामुळे सगळेच जण हैरान झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण कूलर, एसी अथवा पंखा सुरु करुन आरामात राहतो. मात्र मुक्या प्राण्यांच काय? त्यांना या तापमान वाढीचा किती त्रास होत असेल? आणि त्रास झालच तरी ते सांगूही शकत नाहीत. म्हणूनच पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये वाढत्या तापमानापासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कुलर बसविण्यात आले आहेत. उन्हाळ्यात उन्हाच्या झळ्यांपासून सुटका करण्यासाठी थंड पाण्याने प्राण्यांना दिलासा दिला जात आहे.

पुण्यातील या कात्रज सर्पोद्यानामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, विविध प्रजातींचे साप तसेच अनेक प्राणी आहेत. पुण्यामधील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले. त्यामुळे या वाढत्या तापमानापासून प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी संग्रहालयाकडून कूलर बसवण्यात आले आहेत. तसेच पिंजऱ्यांनमधे स्प्रिंकलर बसवून तापमान कमी करण्याचा प्रयत्न होत आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 + four =